महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या 'या' नगरसेवकाकडून पडळकरांचे समर्थन.. दुचाकीवरून शहरभर फिरवले - सागंली जिल्हा राष्ट्रवादी न्यूज

राज्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या एका राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाने मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे अनोखे स्वागत केले आहे. स्वागत करत त्यांना आपल्या दुचाकीवरून शहरभर फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे.

ncp corporator
राष्ट्रवादीच्या 'या' नगरसेवकाकडून पडळकरांचे समर्थन.. दुचाकीवरून शहरभर फिरवले

By

Published : Jun 27, 2020, 6:56 AM IST

Updated : Jun 27, 2020, 7:45 AM IST

सांगली - शरद पवारांवर टीका केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध होत आहे. मात्र, सांगलीत एका राष्ट्रवादी नगरसेवकाने आमदार पडळकर यांचे स्वागत करत चक्क दुचाकीवर शहरभर घेऊन फिरल्याचा प्रकार घडला आहे. जत नगरपालिकेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने हे धाडस केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस याची दखल घेणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीच्या 'या' नगरसेवकाकडून पडळकरांचे समर्थन.. दुचाकीवरून शहरभर फिरवले
राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली होती. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचे बेधडक वक्तव्य केले होते. आमदार पडळकर यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले. या वक्तव्यानिषेधार्थ ठीक-ठिकाणी आमदार पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार पडळकर यांना फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले चित्र दिसत असताना, दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या एका राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाने मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत करत त्यांना आपल्या दुचाकीवरून शहरभर फिरवल्याचा प्रकार समोर आला आहे. जत मधल्या जत नगरपालिकेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीम एडके यांच्याकडून हा प्रकार घडला आहे. आमदार पडळकर हे आज जत तालुका दौऱ्यासाठी जत शहरात पोहचले होते. यानंतर जत नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके हे पडळकर यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर नगरसेवक एडके यांनी आपल्या दुचाकीवरून आमदार पडळकर यांना शहरभर फिरवले.

राज्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ही पडळकर यांच्या विरोधात असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक असणारे टीमु एडकेच पडळकर यांना घेऊन फिरत असल्याने जत शहरांमध्ये सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या प्रकारानंतर सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रवादीचे नगरसेवक असणाऱ्या टीमु एडके यांच्याबाबतीत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.


Last Updated : Jun 27, 2020, 7:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details