सांगली -केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यात रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.
गॅस दरवाढीचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. सांगलीतही गॅस दरवाढीचे पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून केंद्राच्या या दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापत केंद्राच्या गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. महिला आघाडीच्या अध्यक्ष विनया पाठक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी केंद्र सरकारने केलेली दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.