सांगली : गाजर दाखवून आणि गाजराने केक कापून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ( NCP Youth Congress Celebrated PM Modi Birthday ) सांगलीमध्ये साजरा केला. बेरोजगार दिन म्हणून पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा ( National Unemployed Day ) करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले ( NCP Celebrated Modi Birthday in Unique Way ) आहे.
Movement of NCP : गाजर दाखवत बेरोजगार दिन म्हणून राष्ट्रवादीकडून पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा - गाजर दाखवत राष्ट्रवादीकडून मोदींचा वाढदिवस
गाजर दाखवून आणि गाजराने केक कापून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ( NCP Youth Congress Celebrated PM Modi Birthday ) सांगलीमध्ये साजरा केला. बेरोजगार दिन म्हणून पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ( National Unemployed Day ) अनोखे आंदोलन करण्यात आले ( NCP Celebrated Modi Birthday in Unique Way ) आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सांगलीमध्ये अनोख्या पद्धतीने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होतो आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सांगलीमध्ये अनोख्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गाजर दाखवून आणि गाजराने थेट केक कापत नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा :मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा "राष्ट्रीय बेरोजगार"दिवस असल्याची टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शहरातल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत नरेंद्र मोदी यांचा उपहासात्मक वाढदिवस साजरा केला आहे.