महाराष्ट्र

maharashtra

Award Announced: तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

By

Published : Nov 29, 2022, 2:13 PM IST

Award Announced: नवी दिल्ली संगीत नाटक अकादमी तर्फे दिला जाणारा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्यनिर्माते व भारतीय तंतुवाद्य केंद्राचे संचालक मजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांना जाहीर झाला आहे. 1 लाख रूपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर
तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर

सांगली:नवी दिल्ली संगीत नाटक अकादमी तर्फे दिला जाणारा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिरजेतील ज्येष्ठ तंतुवाद्यनिर्माते व भारतीय तंतुवाद्य केंद्राचे संचालक मजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांना जाहीर झाला आहे. 1 लाख रूपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कारामुळे मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रात बहुमानाचा तुरा खोवला गेला आहे.

शास्त्रीय संगीताचे माहेरघर:मिरज नगरी ही तंतूवाद्यांचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे. शुक्रवारपासून मिरज शहरामध्ये तंतू वाद्यांची निर्मिती केली जाते, संगीत क्षेत्रामध्ये मिरजेतल्या तंतूवाद्यांना पहिली पसंती असते. शास्त्रीय संगीत हा देखील सांगलीचा अविभाज्य घटक असल्याने शास्त्रीय संगीताचे माहेरघर म्हणून सांगलीची ओळख आहे. किराना घराण्याचे आद्य संस्थापक अब्दुल करीम खॉं यांची मिरज ही कर्मभूमी राहिली आहे.

तंतुवाद्यनिर्माते मजीद सतारमेकर यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

१८५० पासून इथे ही वाद्य तयार केली: पं. विष्णू दिगंबर पलुसकर, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विनायक बुवा पटवर्धन, निळकंठबुवा जंगम हे सांगली जिल्ह्यातले आहेत. सतार, तंबोरा संवादिनी या तंतूवाद्यासाठी मिरज प्रसिद्ध असून १८५० पासून इथे ही वाद्य तयार केली जातात. त्यासाठी मिरजेची सतारमेकर गल्ली देशभरात प्रसिद्ध आहे. अश्या या तंतूंवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या मिरज शहराच्या शिरोपेत आणखी एक मानाचा शिरोपेच रोवला गेला आहे.

सर्वोच्च पुरस्कार: आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीदसाहेब यांचे पाचव्या पिढीतील वंशज असणाऱ्या मजीद सतारमेकर यांना नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी संस्थेने पुरस्कार जाहीर केले आहे. तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रामध्ये हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, आणि तो मजीद सतारमेकर यांना पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे मिरज शहरासह संगीत क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details