सांगली - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्यामुळे पाणीपातळी वाढून नागठाणे येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या 'तीन' तालुक्यातील अतिवृष्टी
जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. वाळवा-इस्लामपूर तालुक्यात 97.1, मिरज तालुक्यात 64.01 तर पलूस तालुक्यात 67.3 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार आहेत.