सांगली : नागपंचमीसाठी जगप्रसिध्द असणार 32 शिराळा येथे आज नागपंचमी सण उत्साहात साजरा होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिराळा येथे जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येत आहे. तर जिवंत नागांच्या पूजेची परवानगी मिळावी अशी मागणी आजही कायम आहे. तर नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, शिराळा नगरीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वन विभागाची करडी नजर आहे.
याआधी घरोघरी जिवंत नागांची पूजा: शिराळा येथील नागपंचमी जिवंत नागांच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध आहे. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी जिवंत नागांची पूजा होत असे. येथील महिला या नागाला आपला भाऊ मानतात आणि नागपंचमीच्या निमित्ताने आपल्या भावासाठी उपवास करतात. हा उपवास नागपंचमीच्या दिवशी नागाच्या पूजेनंतरच सोडला जातो. 2006 मध्ये वन्य प्राणी मित्रांकडून जिवंत नागांचा नागपंचमी दिवशी छळ होतो असा आरोप करण्यात आला होता. यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून शिराळातल्या जिवंत नागपूजा व मिरवणुकीवर बंदी घातली होती.
2006 मध्ये वन्य प्राणी मित्रांकडून जिवंत नागांचा नागपंचमी दिवशी छळ होतो असा आरोप करण्यात आला होता. यावर जिवंत नागपूजा व मिरवणुकीवर न्यायालयाने बंदी आणली. तर आता नागपंचमीसाठी जगप्रसिध्द असणार 32 शिराळा येथे नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांची पूजा करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आहे. - अर्चना कदम, महिली भक्त
जगप्रसिद्ध शिराळा येथील नागपंचमी :या नागपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरामध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली. यामुळे शिराळकरांमध्ये मोठी नाराजी आहे. गेल्या काही वर्षांपासून जिवंत नागऐवजी प्रतिकात्मक नागपूजा करून पालखी सोहळा पार पडत आहे.
काय आहे आख्यायिका आणि परंपरा : शेकडो वर्षापूर्वी गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागण्यासाठी शिराळा नगरीमध्ये आले होते. यावेळी नागपंचमीचा सण होता. चिखल मातीच्या नागाची पूजा करण्यात महाजन कुटुंबातील महिला व्यग्र होत्या. त्यामुळे महिलांना गोरक्षनाथ महाराजांना भिक्षा देण्यासाठी बाहेर येण्यास वेळ झाला. महाराजांनी वेळ का झाला, असे विचारले असता नागाचे पूजन सुरू होते. यावर महाराजांनी विचारले जिवंत का, यावर महिलांनी मातीच्या नागाचे पूजन,असे म्हटल्यावर गोरक्षनाथ यांनी जिवंत नाग प्रकट केला व त्याची पूजा करण्यास सांगितले. तेव्हापासून शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली, अशी आख्यायिका आहे. तेव्हांपासून शिराळ्यामध्ये दर नागपंचमीला घरोघरी जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. यादिवशी शिराळा येथील महिला एका दिवसाचा उपवास करतात. जिवंत नागला भाऊ मानूना त्याची पूजा करतात. यानंतर गावातून तरुण मंडळे या नागदेवतेची मिरवणूक काढतात. नागांची पूजा व मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशाभरतून लाखो भाविक आवर्जून हजेरी लावतात.
जिवंत नागपूजेवर आली बंदी : 2006 दरम्यान वन्यप्रेमी संघटनांनी जिवंत नागांची पूजा आणि मिरवणुकीमुळे नागांचा छळ होत असल्याचा आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात या याचिककेवर सुनावणी झाली. जिवंत नागपूजा व मिरवणुकीवर न्यायालयाने बंदी आणली. शिराळकरांनी यावर न्यायालयीन लढाईसुद्धा केली. अनेकवेळा आंदोलनही केले. मात्र न्यायालयाने आपला आदेश कायम ठेवला. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून शिराळ्यामध्ये महिला मातीच्या नागांची आणि प्रतिमांची पूजा करुन न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करत आहेत. यंदाही शिराळकरांनी साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली आहे. मातीच्या नागांचे पूजन करत केंद्र सरकारने बैलगाडी शर्यतीप्रमाणे नागपंचमीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा -
- Nagapanchami Today : नागपंचमीला नाग देवतेला प्रसन्न करण्यासाठी दिला जातो कोंबड्याचा बळी, वाचा कुठे आहे ही प्रथा
- Snakes Enter in Society : नागपंचीमच्या दिवशीच नागांची जोडी सोसायटीत शिरल्याने रहिवाशांमध्ये भीती
- Nagpanchami 2023 : काय आहे नागपंचमीचे महत्त्व? जाणून घ्या आजची पूजेची वेळ आणि पूजा करण्याची पद्धत