महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

nagpanchami 2021 : यंदाही शिराळ्यात साध्या पद्धतीने घरोघरी नागपंचमी साजरी - nagpanchami in maharashtra

न्यायालयाचे आदेश आणि कोरोनाचे सावट या पार्श्वभूमीवर ही नागपंचमी साजरी होत आहे. घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकर यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहेत.

शिराळा नागपंचमी
शिराळा नागपंचमी

By

Published : Aug 13, 2021, 3:28 PM IST

सांगली - जगप्रसिद्ध शिराळ्याची नागपंचमी यंदाही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. न्यायालयाचे आदेश आणि कोरोनाचे सावट या पार्श्वभूमीवर ही नागपंचमी साजरी होत आहे. घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकर यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहेत. तर प्रशासनाकडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घरोघरी प्रतिकात्मक नागपूजा

सांगली जिल्ह्यात शिराळा येथे जिवंत नागांच्या पूजेची परंपरा होती. मात्र 2002पासून न्यायालयाच्या आदेशानंतर येथे साध्या पद्धतीने नागपूजा करण्यात येत आहे. यंदा न्यायालयाच्या आदेशाबरोबर कोरोनाचेही सावट आहेच. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने घरी नागपंचमी उत्सव साजरा होत आहे. घरोघरी महिलांकडून प्रतिकात्मक व मातीच्या नागांची पूजा करण्यात येत आहे.

गाव बंद, प्रवेशही बंद

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनासंबंधी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत. तर नागपंचमीच्या निमित्ताने यावेळी 10 जणांच्या उपस्थितीत पालखी निघाली. आंबामाता मंदिरात केवळ 5 जणांच्या उपस्थितीत पूजा पार पडली. त्याचबरोबर 14 ऑगस्ट सकाळपर्यंत गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी प्रवेशबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. उत्सवावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याबरोबर गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिराळाकर नागरिकांना प्रथेनुसार जिवंत नागांच्या पूजेला सरकारने परावनगी द्यावी, अशी मागणीही होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details