महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तासगाव खून प्रकरण : पत्नीसोबत जबरदस्ती केल्याच्या रागातून खून; दाम्पत्याला अटक - पती पत्नीने मिळून केला खून तासगाव

तासगाव शहरालगत असणाऱ्या भिलवडी तासगाव रस्त्यावरील एका शेतामध्ये असणाऱ्या विहिरीत 10 जून रोजी प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची कोणतीच ओळख नसल्याने सांगली पोलिसांच्या समोर मृतदेहाची ओळख पटवणे मोठे आव्हान होते.

murdered of one by couple in tasgaon sangli
तासगाव खून प्रकरण

By

Published : Jun 16, 2021, 6:54 AM IST

Updated : Jun 16, 2021, 7:37 AM IST

सांगली - तासगावमधील विहिरीत सापडलेल्या मृतदेह प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. पत्नीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून खून करत विहिरीत फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघा पती-पत्नींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम

तांत्रिक तपासातून मृतदेहाची ओळख -

तासगाव शहरालगत असणाऱ्या भिलवडी तासगाव रस्त्यावरील एका शेतामध्ये असणाऱ्या विहिरीत 10 जून रोजी प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची कोणतीच ओळख नसल्याने सांगली पोलिसांच्या समोर मृतदेहाची ओळख पटवणे मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे या मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्याचा छडा लावण्याचा जबाबदारी होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मृतदेहाच्या ओळख पटवण्याबाबत तपास सुरू केला. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर यासह शेजारच्या कर्नाटक राज्यात मृतदेहाची ओळख पटवण्याबाबत तपास सुरू असताना, तांत्रिक तपासात तासगाव नगरपालिकेच्या ठिकाणी जेसीबीचे काम सुरू असलेल्या कामाची माहिती मिळाली. त्याठिकाणी जाऊन माहिती घेतली असता, जेसीबी मालक हा कर्नाटकच्या मंगसुळी येथील असून तो गायब असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी जेसीबी मालकाच्या नातेवाईकांशी संपर्क करत तपास केला असता, मृतदेहाची ओळख पटली. हरी पाटील असे या मृत जेसीबी मालकाचे नाव असल्याचे समोर आले.

हेही वाचा -कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक

पती-पत्नीने मिळून केला खून -

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढील तपास करताना जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करणारा सुनील राठोड (वय-26, रा. सिंदघी, विजापूर, कर्नाटक) हा गायब असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांचा राठोड याच्यावर संशय बळावला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याचा शोध घेत, सुनील राठोड आणि त्याच्या पत्नीला पुणे येथून ताब्यात घेत अधिक चौकशी केली. यावेळी सुनील याने आपल्या पत्नीसोबत मिळून हरी पाटील याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

खून केल्यानंतर 2 दिवस मृतदेह घरात -

हरी पाटील यांच्या जेसीबीवर आपण काम करत असल्याने तासगाव याठिकाणी कामानिमित्ताने राहण्यास होतो. यादरम्यान हरी पाटील याने घरी पत्नी एकटी असताना जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार पत्नीने आपल्यास सांगितल्यावर आपण हरी पाटील यांचे काम सोडले होते. मात्र, हरी पाटील हे कामावर पुन्हा बोलावण्यासाठी 8 जून रोजी घरी आले असता वादावादीचा प्रकार घडला. यावेळी पत्नीसोबत केलेल्या रागातून खोरे डोक्यात घालून खून केला होता. त्यानंतर दोन दिवस मृतदेह घरात ठेवून 10 जूनला भिलवडी रोडवरील एका शेतात असणाऱ्या विहिरीत फेकून दिल्याची कबुली सुनील राठोड याने दिली. यानंतर हरी पाटील यांच्या खूनप्रकरणी सुनील राठोड व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

हेही वाचा -VIDEO : व्हॅनचालकाने तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेली दुचाकी

Last Updated : Jun 16, 2021, 7:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details