सांगली -चारित्र्यांच्या संशयातून पतीने २७ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली व त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना शिराळा तालुक्यातील फकीरवाडी येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. सुवर्णा सुभाष पवार (वय 27 ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर सुभाष सदाशिव पवार असे आरोपी पतीचे नाव आहे.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची धारदार शस्त्राने हत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न, शिराळ्यातील घटना - पत्नीची हत्या
रित्र्यांच्या संशयातून पतीने २७ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली व त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना शिराळा तालुक्यातील फकीरवाडी येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मृत सुवर्णा सुभाष पवार हिचे अकरा वर्षांपूर्वी सुभाष पवार सोबत लग्न झाले होते. त्यांना एक दहा वर्षाचा व एक सात वर्षाचा असे दोन मुले आहेत. सुभाष याला दारूचे व्यसन असल्याने सुवर्णावर चारित्र्याच्या संशय घेऊन तो वारंवार वाद करत होता. याच वादातून पती सुभाष सदाशिव पवार याने शनिवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फकिरवाडी गावचे हद्दीतील अब्दुल कादर पिरजादे यांच्या मालकीच्या शेतात सुवर्णाचा धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला व स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करणेचा प्रयत्न केला.
सुभाष पवार याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलीस पाटील यांनी शिराळा पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, एएसआय झाजरे, अरुण कानडे, विनोद जाधव, चंद्रकांत कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सासू बबुताई सदाशिव पवार, सासरे सदाशिव बाळू पवार, दीर दिगंबर सदाशिव पवार (सर्व रा. फकीर वाडी तालुका शिराळा) यांनी मिळून सुर्वणाला ठार केल्याची तक्रार मृत महिलेचे वडील भगवान श्रीपती पाटील (वय 50 रा.शितूर ता. शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर) यांनी शिराळा पोलिसात दिली आहे. पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लवार अधिक तपास करीत आहेत.