महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जतमधील साळमळगेवाडीत दूध व्यावसायिक तरुणाचा गळा चिरून खून - Deputy Superintendent of Police Ratnakar Navale

जत तालुक्यातील साळमाळगेवाडी येथील अजित बाबासो खांडेकर (20 वर्ष) या युवकाचा अज्ञाताकडून गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान घडली.

अजित बाबासो खांडेकर
अजित बाबासो खांडेकर

By

Published : Jan 22, 2021, 9:55 PM IST

सांगली/जत - जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथील अजित बाबासो खांडेकर (20 वर्ष) या युवकाचा अज्ञाताकडून गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान जिरग्याळ रस्त्याच्या बाजूला घडली.

अजित खांडेकर याची दूध डेअरी असुन तो वाडी वस्तीवर जाऊन दूध संकलन करीत असे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता दूध संकलित करण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. साडेसात वाजता दूध संकलित करून त्याने दूध आपल्या सहकाऱ्यांकरवी जिरग्याळ येथील दूध संकलन केंद्रात पाठवले. त्यानंतर खांडेकर पुढील वस्तीवर दूध संकलनासाठी गेला.

मृतदेह जाळण्याचा प्रयत्न-

अजित खांडेकर रात्री आठ वाजच्या सुमारास एका वस्तीवरील दूध घेऊन येत होता. त्यावेळी एक किमी अंतरावर साळमाळगेवाडी हद्दीत अज्ञाताकडुन त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हा प्रकार शुक्रवारी सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्याने संबंधित व्यक्तीने जत पोलीस ठाण्यास व खांडेकर कुटुंबियांना याबाबत कळविले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक उत्तम जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी भेट दिली.

हेही वाचा-पूर्ववैमनस्यातून काकांचा पुतण्याकडून खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details