महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार संजयकाका पाटील यांना कोरोनाची लागण - खासदार संजयकाका पाटील ताज्या बातम्या

दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री त्यांचा आहवला पॉझिटिव्ह आला आहे.

संजयकाका पाटील
संजयकाका पाटील

By

Published : Sep 8, 2020, 1:22 AM IST

सांगली - खासदार संजयकाका पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्राथमिक लक्षणे दिसल्याने खासदार पाटील यांनी कोरोना टेस्ट केली होती. दरम्यान, सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर पाटील यांची प्रकृती उत्तम असल्याने घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांना सोमवारी कोरोनाची लागण झाली आहे. खासदार पाटील हे गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होते, दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री त्यांचा आहवला पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणताच त्रास जाणवत नसल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच खासदार पाटील यांनी आपली प्रकृती उत्तम असून गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या व्यक्तींना लक्षणे असल्यास कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details