सांगली - गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये द्राक्षबागा, भाजीपालासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.
अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करुन तातडीने आर्थिक मदत द्या - खासदार संजयकाका पाटील - खा. संजय पाटील
सांगली जिल्ह्यातील अवकाळी व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त द्राक्षबागा, भाजीपालासह इतर पिकांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी, खासदार संजय पाटील यांनी केली आहे.
अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्या
आधीच कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून त्यांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आल्याची माहितीही संजय काका पाटील यांनी दिली आहे.