महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या- खासदार छत्रपती संभाजीराजे - खासदार छत्रपती संभाजीराजे

छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने त्यांचा पराभव म्हणजे तो आमचा पण पराभव आहे. या पराभवचे मनापासून आम्हाला पण दुःख वाटत आहे. पण सुख आणि दुःख बघण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराभव हा उद्या विजयाकडे कसा नेता येईल, याचा उदयनराजे नक्की विचार करत असतील.

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या; उदयनराजेच्या पराभवाचे आम्हालाही दुःख - खासदार छत्रपती संभाजीराजे

By

Published : Oct 26, 2019, 9:03 PM IST

सांगली - राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाची एक तरी बैठक ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर व्हावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच उदयनराजेंच्या पराभवाचे आम्हालाही दुःख आहे. या पराभवाचा ते नक्कीच विचार करतील, असा विश्वासही खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीच्या कवलापूर येथे बोलत होते.

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक रायगडावर घ्या; उदयनराजेच्या पराभवाचे आम्हालाही दुःख - खासदार छत्रपती संभाजीराजे

सांगलीच्या कवलापूर मधील स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठानने पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संभाजीराजे कवलापूरमध्ये आले होते. या उद्घाटानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने उदयनराजे यांचा पराभव म्हणजे तो आमचा पण पराभव आहे. या पराभवचे मनापासून आम्हाला पण दुःख वाटत आहे. पण सुख आणि दुःख बघण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे. आजचा पराभव हा उद्या विजयाकडे कसा नेता येईल, याचा उदयनराजे नक्की विचार करत असतील, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -VIDEO: महाराष्ट्राच्या जनादेशाचे सविस्तर विश्लेषण...

पद हा एक भाग आहे. मात्र, छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते. रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे. उदयनराजे पुन्हा एकदा नव्या जोमाने काम सुरू करतील आणि या पराभवातून ते बाहेर पडतील, असा विश्वास संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळाला उद्देशुन बोलताना गावाचा विकास करायचा असेल तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्यायला हवे. त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. फक्त जय जयकार करून चालणार नाही. मंत्रिमंडळाची एक तरी कॅबिनेट बैठक रायगडावर घ्यावी, अशी विनंती नवीन होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपण करणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -'सभागृह नेता' निवडण्यासाठी भाजपने बोलावली बैठक

खासदार आणि राजकीय नेता अशी माझी फक्त ओळख असण्याऐवजी किल्ले संवर्धन करणारा, अशी माझी ओळख भविष्यात व्हावी. रायगड पूर्वी जसा होता तसा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 600 कोटी मंजूर केले आहेत. तर अन्य 10 किल्ल्यांसाठी आणखी 100 कोटी केंद्राकडून मिळणार आहेत. असेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details