महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन चिमुरड्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Aarohi Hattekar death sangli

दोन चिमुरड्यांसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विटा शहारत ही धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात सोनाली हात्तेकर या विवाहित महिलेने आपली चार वर्षाची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Mother commits suicide sangli
सोनाली हात्तेकर आत्महत्या सांगली

By

Published : Feb 7, 2022, 7:52 PM IST

सांगली - दोन चिमुरड्यांसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विटा शहारत ही धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात सोनाली हात्तेकर या विवाहित महिलेने आपली चार वर्षाची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

मृतदेह काढतानाचे दृश्य

हेही वाचा -Singer Lata Mangeshkar : लता दीदींनी 'या' ठिकाणी गिरवले होते संगीताचे पहिले धडे

किरकोळ वादानंतर मुलांना घेऊन आईची आत्महत्या

विटा शहरातील शाहूनगर येथील नगरपालिकेच्या शाळेजवळ बिहुदेव आणि सोनाली हात्तेकर कुटुंब भाड्याच्या खोलीत राहाते. रविवारी रात्रीच्या सुमारास हात्तेकर पती - पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास सोनाली हात्तेकर (वय 26) या आपली चार वर्षीय मुलगी आरोही आणि एक महिन्याचे बाळ घेऊन घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी सोनाली आणि मुलांचा शोध सुरू केला. मात्र, कुठेही त्या आढळून आल्या नाहीत.

विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

दुपारच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर येथील राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एक महिला आणि दोन चिमुरड्यांचे मृतदेह आढळून आले. विटा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पंचनामा केला असता मृतदेह हे सोनाली हात्तेकर, मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या बाळाचे असल्याचे समोर आले. घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. तर किरकोळ कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा -Rambhau Lad Passed Away : तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन

ABOUT THE AUTHOR

...view details