सांगली - इस्लामपूर येथील मोका कारवाई करण्यात आलेल्या एका टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस आणत सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.
मोका लावण्यात आलेल्या टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस
इस्लामपूर येथील मोका कारवाई करण्यात आलेल्या एका टोळीकडून ८ घरफोड्या उघडकीस आणत सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केली.
मुक्या पवार या टोळीवर नुकतेच इस्लामपूर पोलिसांकडून मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. गेल्या पंधरवड्यात तुजारपुर येथे दरोडयाची घटना घडली होती. या दरोडयाचा छडा लावत पोलिसांनी मुक्या पवार टोळीतील ४ आरोपींना शिताफीने अटक केली होती. यावेळी कसून चौकशी केली असता इस्लामपूर, ताकारी, भवानीनगर परिसरात झालेल्या ८ घरफोड्यांची कबूली त्यांनी दिली. या प्रकरणी बंजारा बिरज्या पवार, आतेश उर्फ रोहित उर्फ कोथळा जितेंद्र काळे, तुषार उर्फ चिमन्या इन्कलाब काळे या चौघांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून २ सोन्याचे लक्ष्मीहार, गळयातील २ सोन्याच्या चैन, ४५ गॉगल, १ एलजी कंपनीचा कॉम्प्युटर व रोख रक्कम २ हजार असा एकूण सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.