सांगली -राज्यातील जलयुक्त शिवार कामांवर होत असलेले आरोप आणि चौकशीच्या पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जलयुक्त शिवारातुन ओसंडून वाहणाऱ्या बंधाऱ्यात उतरत पूजन करत महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली आहे. वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने जलयुक्त शिवारच्या झालेल्या कामांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत.
जलयुक्त शिवारातुन वाहणाऱ्या पाण्याचे पुजन करत सदाभाऊ खोतांनी राज्य सरकारची उडवली खिल्ली - जलयुक्त शिवार
सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांच्या ठिकाणी पाणी पूजन करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
राज्यातील युतीच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारकडून चौकशी लावण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांच्या ठिकाणी पाणी पूजन करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. भर पावसात वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर या ठिकाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात उतरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे पूजन केले. तसेच राज्य सरकारकडून सुरू असलेल्या चौकशी वर बोलताना, चौकशी काय करता, भरलेल्या बंधाऱ्यात उड्या मारून पोहायला लागा मग कळेल, देवेंद्र फडणवीस यांनी काय काम केले आहे, असा टोला यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.