महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोग्य खाते नव्हे यमदूत,तर आरोग्यमंत्री टोपेंनी टोप्या घालने बंद करावे - आमदार खोत - आमदार सदाभाऊ खोत

राज्याचे आरोग्य खाते म्हणजे यमदूत झाले असून गटारगंगा बनलेल्या आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी आता जनतेला टोप्या घालणे बंद करावेत, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवणार, असे सदाभाऊ खोत यांनीइस्ल स्पष्ट केला आहे.

आमदार सदाभाऊ खोत
आमदार सदाभाऊ खोत

By

Published : Nov 6, 2021, 5:00 PM IST

सांगली- राज्याचे आरोग्य खाते म्हणजे यमदूत झाले असून गटारगंगा बनलेल्या आरोग्य खात्याचे मंत्री राजेश टोपे यांनी आता जनतेला टोप्या घालणे बंद करावेत, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीत 11 जणांचा झालेल्या मृत्यूवरून आमदार खोत यांनी ही टीका केली आहे, ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.

बोलताना आमदार सदाभाऊ खोत

एसटीचा लढा शेवटपर्यंत लढणार...

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. रयत क्रांती संघटनेच्यावतीने इस्लामपूर बसस्थानकामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवणार, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केला आहे.

आरोग्य खाते म्हणजे यमदूत...

अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालया अग्नीकांडाबाबत बोलताना आरोग्य मंत्री व आरोग्या खात्यावर खोत यांनी सडकून टीका केली आहे. राज्यातील आरोग्य खाते गटारगंगा झाली असून सध्या राज्याच्या जनतेसमोर आरोग्य खाते यमदूत म्हणून उभा आहे. त्यामुळेच अहमदनगर शासकीय रुग्णालयातील असो किंवा यापूर्वी रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, या सरकारला केवळ वसुली करण्याशिवाय काहीच सूचत नाही. आरोग्य विभागाच्या परिक्षांचे घोळ सुरुच आहेत. आरोग्यमंत्री टोपे हे अभ्यासू मंत्री आहेत, पण आता टोपेंनी जनतेला टोप्या घालणे बंद करावेत, असा टोलाही खोत यांनी लगावला आहे.

हे ही वाचा -VIDEO : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मिरजेत पार पडल्या म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा..

ABOUT THE AUTHOR

...view details