सांगली- मराठा समाजाच्या आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज (दि. 10 मे) राज्यभर आंदोलन करण्यात आले. माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथील आपल्या निवासस्थानी महाविकास विरोधात निदर्शने करत आंदोलन केले आहे.
कुटुंबासह सदाभाऊंचे सरकार विरोधात आंदोलन
मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण. बांधलं काठीला. महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला, अशा हे घोषणा देत राज्यभर आंदोलनास सुरुवात करण्यात आली. इस्लामपूर येथील निवासस्थानी आमदार सदाभाऊ खोत, त्यांच्या आई रत्नाबाई खोतसह कुटुंब या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आमदार खोत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते. पण, या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण धुळीला मिळवले. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत रयत क्रांती संघटना शांत बसणार नाही, असा इशारा आमदार खोत यांनी दिला आहे.
हेही वाचा -सांगलीत काँग्रेस नगरसेवकाने उभारले कोविड सेंटर, मंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते लोकार्पण