महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे 'येडं पेरलं, अन् खुळं उगवलं' - गोपीचंद पडळकर - आमदार गोपीचंद पडळकर बातमी

महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं, अन् खुळं उगवलं’ अशी अवस्था ठाकरे सरकारची झाली आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

MLA Gopichand Padalkar
आमदार गोपीचंद पडळकर

By

Published : Jun 3, 2021, 5:22 PM IST

Updated : Jun 3, 2021, 5:44 PM IST

सांगली - महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं, अन् खुळं उगवलं’ अशी अवस्था ठाकरे सरकारची झाली आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या 'कोरोना गावमुक्त' स्पर्धेवरून पडळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.

प्रतिक्रिया देताना आमदार गोपीचंद पडळकर

हे म्हणजे 'येडं पेरलं, अन् खुळं उगवलं' -

हेही वाचा -कृष्णा कारखाना निवडणूक : 21 जागांसाठीच्या 305 अर्जांपैकी 22 अर्ज अवैध

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून गाव पातळीवरील कोरोना रोखण्यासाठी 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या स्पर्धेची घोषणा केली. मात्र, या स्पर्धेवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर व हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली 'येडं पेरलं, अन् खुळं उगवलं' अशी अवस्था उद्धव ठाकरे सरकारची झाल्याची टीका आमदार पडळकर यांनी केली आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ कामचुकार -

आमदार पडळकर म्हणाले, आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे पुर्णपणे मोडला आहे. कित्येक घरातील कर्ते माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. अशा या स्थितीत त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय. जर ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?‘ हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडलाय, नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही कोरोनामुक्तीची स्पर्धा सुरू केली आहे, अशा शब्दात पडळकर यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.

कोरोनामुक्त स्पर्धा म्हणजे 'भूलथापांची मालिका' -

या योजनेच्या व्यवस्थापनेच्या सर्व 22 निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत. या बाप्याने हे 22 निकष ठरवताना, कुठेही स्पर्धा पार पडणाऱ्या पथकांना किंवा व्यवस्थापणेसाठी निधी कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे. खरंतर स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पन्नास लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो, असं सांगितलं. पण अद्याप एक रुपायाचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबीयांना साधी भेटही दिली नाही, त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे ’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे, असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे.

हेही वाचा -मुकेश अंबानी यांनी 'इतके' घेतले वेतन; वाचून बसेल धक्का

Last Updated : Jun 3, 2021, 5:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details