सांगली- ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) स्थगितीबाबत न्यायालयाच्या निकालावरून आमदार गोपीचंद पडळकर ( MLA Gopichand Padalkar ) यांनी आघाडी सरकार आणि शरद पवारांवर ( Sharad Pawar ) हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षण बाबतीत प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश झाला आहे. आता हक्क मागून नाही तर हिसकावून घ्यावा लागेल, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शकुनी काकाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही, अशी टीका शरद पवारांचे नाव न घेता केली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
प्रस्थापितांच्या नौटंकीचा फर्दाफाश
ओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच न्यायलयाच्या आजच्या निर्णयावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.आमदार पडळकर म्हणाले, आजच्या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा महाराष्ट्रातील बहुजनांपुढे पर्दाफाश झाला आहे. सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले होते की, अध्यादेश काढण्यापूर्वी इंपरीकल डेटा गोळा करा त्यानंतरच अध्यादेश काढा. पण, प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता. म्हणूनच त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला. सुरुवातीपासूनच प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जातो आहे, आज हे पुन्हा सिद्ध झाले, अशी टीका पडळकर यांनी केली.