सांगली- 'जनाब राऊत एमआयएमकी मोहब्बत कौन है ?’ हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. तसेच महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट उड्या मारता, हे रोजच मनोरंजन बंद करा, असा टोलाही आमदार पडळकर यांनी लगावला आहे. एमआयएमचे नेते ओवैसी यांची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेल्या टिकेवरून पडळकर यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आटपाडीच्या झरे येथे ते बोलत होते.
शर्जील उस्मानीवर तुम्हाला कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही
आमदार पडळकर म्हणाले, उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्त्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडूण आले आहेत. हे कदाचित "जनाब" संजय राऊत विसरले असतील. त्यामुळे त्यांनी ओवैसीची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण, याच ओवैसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या ईदीचा नजराणा तुम्ही पेश केला आहे. एवढेच नाही तर अमरावती पालिकेतही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. त्यामुळे आता ‘जनाब राऊत एमआयएमकी मोहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही. तसेच योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील, ते सक्षम आहेत. पण, महाराष्ट्रातील हिंदूंना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर कारवाई करण्याची तुमच्यात हिंमत नाही, अशा प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवण्याची आवश्यकता नाही. त्याच बरोबर महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट उड्या मारता हे रोजच मनोरंजन बंद करा. कारण आता महाराष्ट्रातील जनतेला या खेळाची किळस येत आहे, अशी बोचरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
हेही वाचा -भारतीय सैन्य दलाची शान टी - 55 रणगाडा शांतिनिकेतन लोकविद्यापीठात स्थापित