सांगली - आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेट मंत्री पद मिळते, मग एमपीएससीमधील विद्यार्थ्यांची नियुक्ती का होत नाही, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. तर या सरकारला कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
'हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही'
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. भाजपा आमदार व प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनीही मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. आमदार पडळकर म्हणाले, मराठा आणि धनगर समाजाला या सरकारला आरक्षण द्यायचे नाही. राज्यातील 413 एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आद्यप नियुक्ती दिली नाही. ठाकरे सरकारने या विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे.
'या सरकारला धनगर अन् मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही'