महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर्यन खानसाठी बैठक घ्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ, एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चेला वेळ का नाही..? - गोपीचंद पडळकर - sangli news

राज्य सरकारने वेळीच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल असती तर 31 एसटी कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले असते व जनतेची गैरसोय टळली असती. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

पडळकर
पडळकर

By

Published : Nov 8, 2021, 3:48 PM IST

सांगली- एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आपली जबाबदारी न्यायालयात ढकलून नामानिराळे राहायचा आघाडी सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच 31 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का, असा सवाल करत आर्यन खानच्या सुटकेसाठी बैठक घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठी एसटी कार्मचाऱ्यांच्यासाठी चर्चा करायला वेळ नाही, अशी टीकाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर

...तर 31 एसटी कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले असते

आमदार पडळकर म्हणाले, काल (रविवारी) परत बीडमधील एका एसटी कामगार बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, डॅाक्टरांमुळे त्याचा प्राण वाचला, परिस्थिती नाजूक आहे. आतापर्यंत 31 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे प्रस्थापितांचे सरकार झोपेचे सोंग घेत असून न्यायालयाची दिशाभूल करत आहे. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती, तर 31 जणांचे प्राण वाचले असते. तसेच महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी आहोत, असेही यावेळी आमदार पडळकर यांनी दिली आहे.

जबाबदारी टाळण्याचा डाव

आर्यन खानची सुटका व्हावी म्हणूनसाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही.आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे.पण त्या 31 कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा.

हे ही वाचा -सांगलीत एसटी कर्मचारी आक्रमक, जबरदस्तीने सुरू केली जाणारी बस वाहतूक रोखली

ABOUT THE AUTHOR

...view details