सांगली -दूध उत्पादकांच्या दुधाला दरवाढ मिळावी यासाठी भाजपा आणि मित्रपक्षांनी राज्यव्यापी दूध आंदोलनाला सुरुवात केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी गाईंना दुधाचा अभिषेक घालत दूध दरवाढीसाठी आंदोलन केले. सांगलीच्या आटपाडी येथील दिघंचीमध्ये पडळकर यांनी गाईंना घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.
दूध आंदोलन: आमदार गोपीचंद पडळकरांनी गाईला घातला दुधाचा अभिषेक - आमदार पडळकर गायी अभिषेक
राज्य सरकारने गाय आणि म्हशीच्या दूधदरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करावी. दूध भूकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी दिघंचीमधील कराड- सोलापूर मार्गावर गोपीचंद पडळकर यांनी गाई-म्हशींना घेऊन रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार पडळकर यांनी गाईंना दुधाचा अभिषेक घालत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राज्य सरकारने गाय आणि म्हशीच्या दूधदरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करावी. दूध भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे, दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी दिघंचीमधील कराड-सोलापूर मार्गावर पडळकर यांनी गायी-म्हशींना घेऊन रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार पडळकर यांनी गाईंना दुधाचा अभिषेक घालत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकार आपल्याच मंत्र्यांच्या दूध संघाकडून दुधाची खरेदी करून त्यांना अनुदान देत, असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर यापुढील काळात महायुती राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिला.