सांगली -सांबराची शिंगे तस्करी करणाऱ्या एका आरोपीला मिरज पोलिसांनी आज अटक केली. यावेळी त्याच्याकडून २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रसिक प्रविण जकाते (२४, रा.मलेवाडी, मिरज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सांबराची शिंगे तस्करी करणाऱ्यास अटक, २ लाखाचा मुद्देमाल जप्त - rasik jakate
मिरज पोलिसांनी सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस अटक करत त्याच्याकडील २ लाख रुपये किमतीची शिंगे जप्त केली आहेत.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पोलीस
मिरज पोलिसांना शहरातील खबऱ्याकडून जिना साहेब दर्गा येथे एक व्यक्ती सांबर जातीच्या हरणांची शिंगे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे २ सांबराची शिंगे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडील २ लाख रुपये किमतीची शिंगे जप्त केली.