सांगली - इंस्टाग्रामवर मैत्री ओळख करून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर मध्ये घडला आहे.याप्रकरणी जयदीप चौधरी तेरणा विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सोशल मीडियावर मैत्री करत बलात्कार
इस्लामपूर या ठिकाणी राहणारा जयदीप चौधरी,वय 23 या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणीशी जानेवारी 2021मैत्री केली.त्यानंतर वारंवार "त्या" मुलीशी चॅटिंग करून ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.त्यानंतर सदरची पीडित अल्पवयीन मुलगी ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इस्लामपूर या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्याकडे एप्रिल महिन्यात आली होती.त्यानंतर जयदीप याने अल्पवयीन असणाऱ्या पीडित मुलीला भेटायची इच्छा व्यक्त केली. इस्लामपूर बसस्थानकामध्ये हे दोघेही भेटले त्यानंतर जयदीप यांनी पीडित अल्पवयीन मुलीला इस्लामपूर नदीत असणारा रामलिंग बेट या ठिकाणी फिरण्यासाठी नेले,तसेच यावेळी तिच्यावर अत्याचार केला.
सोशल मीडियावर झाली ओळख, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केले गर्भवती
इस्लामपूर या ठिकाणी राहणारा जयदीप चौधरी,वय 23 या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणीशी जानेवारी 2021मैत्री केली.त्यानंतर वारंवार "त्या" मुलीशी चॅटिंग करून ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.त्यानंतर सदरची पीडित अल्पवयीन मुलगी ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इस्लामपूर या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्याकडे एप्रिल महिन्यात आली होती.त्यानंतर जयदीप याने अल्पवयीन असणाऱ्या पीडित मुलीला भेटायची इच्छा व्यक्त केली.
इस्लामपूर पोलिस स्टेशन
मुलीच्या पोटात दुखू लागले
त्यानंतर सदर पीडित अल्पवयीन तरुणीवर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला.दरम्यान सात नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता,ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं.त्यानंतर सर्व प्रकार समोर आला,यानंतर पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत जयदीप चौधरी यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.