सांगली - सत्तेचा माज भाजपाला कसा आला आहे, हे उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळत असल्याची टीका कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना झालेल्या मारहाणीवरून कदम यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपला सत्तेचा माज, मंत्री विश्वजीत कदम यांची टीका हेही वाचा -ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला नागपुरात पदोन्नती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशाच्या हाथसरमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी देशभर पडसाद उमटत आहेत. मंत्री कदम यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेशाच्या भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. सांगली दौऱ्यावर आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की ही निंदनीय आहे, असे ते म्हणाले.
'राहुल गांधींसारख्या देशाच्या नेत्याला धक्काबुक्की होते, ही लोकशाहीची हत्या आहे. कायद्याचा बट्ट्याबोळ करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारला लाज वाटली पाहिजे, तसेच सत्तेची माज भाजपा सरकारला कसा आला आहे, ते आज उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळत आहे आणि भाजपा सरकारला कशाची फिकिर नाही,' असा आरोप मंत्री कदम यांनी केला.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले...