महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसने पाठींबा काढावा,आम्ही सरकार बनवु - रामदास आठवलेंची काँग्रेसला साद

अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याबरोबर त्या राज्यात दलितांच्यावर अत्याचार वाढले आहे. समाजात सामंजस्य निर्माण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ महाआघाडीतील पक्षांच्या नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू, महाआघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांना फक्त डावलण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या आवाहन आहे. त्यांनी काँग्रेसचा महाविकास आघाडीला दिलेला पाठींबा काढला,तर आमची सरकार बनवण्याची तयारी आहे,असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

रामदास आठवले
रामदास आठवले

By

Published : May 26, 2022, 4:52 PM IST

सांगली - अपमानित होऊन सत्तेत राहण्यापेक्षा काँग्रेसने आघाडीचा पाठींबा काढून बाहेर पडावे. आमची सरकार बनवण्याची तयारी आहे,
असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच एल्गार परिषदेमुळे भीमा-कोरेगाव दंगल झाली नाही, असे मत व्यक्त करत धोका देणाऱ्या राज ठाकरेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

जनतेला न्याय देण्यात आघाडी सरकार अपयशी -राज्यातील महाविकास आघाडी सत्तेत आली. मात्र, राज्यातल्या जनतेला न्याय देण्यामध्ये महाविकासआघाडी अपयशी ठरली आहे.अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याबरोबर त्या राज्यात दलितांच्यावर अत्याचार वाढले आहे. समाजात सामंजस्य निर्माण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ महाआघाडीतील पक्षांच्या नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू, महाआघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांना फक्त डावलण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या आवाहन आहे. त्यांनी काँग्रेसचा महाविकास आघाडीला दिलेला पाठींबा काढला,तर आमची सरकार बनवण्याची तयारी आहे,असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

एल्गार परिषदे आणि दंगलीचा संबंध नाही -त्याच बरोबर एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भिमाची दंगल झाली,असा आरोप करण्यात आला आहे. पण आपण त्या आरोपांशी सहमत नाही. एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव दंगलीचा काही संबंध नाही. एल्गार परिषदेत भाषण करणाऱ्या नेत्यांचा आणि दंगलीचा ही कोणता संबंध नाही. त्यामुळे दंगली बद्दल एल्गार परिषदे मधील लोकांच्या कारवाई करणे योग्य नाही,अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय रामदास आठवले यांनी मांडली आहे.

राज ठाकरेंनी बाळासाहेबांना धोका दिला -मनसे नेते राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून बोलताना मंत्री आठवले म्हणाले, काही नेते समाज्याला भडकवण्याच काम करत आहे.पण महाराष्ट्रातील जनता डॉ.आंबेडकरांच्या विचारांना माणनारी जनता आहे. त्यामुळे भडकवणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना धोका देणाऱ्या राज ठाकरे यांना,बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, त्याच बरोबर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये येण्यास भाजपचे खासदार विरोध करत आहेत. विरोध करणाऱ्या भाजपा खासदारांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे,असे मतही व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details