सांगिली - राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठया प्रमाणात भेसळ होत असल्याची कबुली राज्याचे अन्न-औषध राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी दिली. या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असून जे अधिकारी कारवाई करणार नाहीत, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.
'दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठया प्रमाणात भेसळ, 'या' अधिकाऱ्यांवर होणार कारवाई'
राज्यात दुध आमि दुग्धज्य पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची कबुली अन्न-औषध राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सांगलीमध्ये आज अन्न-औषध राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राज्याचे अन्न-औषध राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यात अन्नधान्याबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ होत असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यामुळे अशी भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे सांगत, जो अधिकारी भेसळीवर कारवाई करणार नाही, त्या अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा, राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिला आहे.