महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनंजय मुंडेंचे वक्तव्य ही राष्ट्रवादीची विचारसरणी; सदाभाऊ खोतांची टीका - sadabhau khot in sangali

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे, हे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे, हे दिसून येत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

By

Published : Oct 20, 2019, 6:36 PM IST

सांगली- राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे, हे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. तसेच पंकजा मुंडे यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन भाषा करणाऱ्या धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीतून जनता हद्दपार करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी काय आहे, हे दिसून येत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या धनंजय मुंडे यांची दादागिरी जनता सहन करणार नाही. या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून देईल, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांच्याबद्द्ल केलेले वक्तव्य महाराष्ट्र सहन करणार नाही, असे ते म्हणाले. तसेच धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details