महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने संसदेमध्ये भूमिका घ्यावी'

मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही पूर्ण प्रयत्न झाले. आता केंद्र सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत संसदेत भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : May 29, 2021, 7:39 PM IST

सांगली- मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही पूर्ण प्रयत्न झाले. आता केंद्र सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत संसदेत भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेले आरोप जाणीवपूर्वक करण्यात आलेले षडयंत्र असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केले आहेत. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बोलताना मंत्री पाटील

आता केंद्राने संसदेत भूमिका घ्यावी

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावर बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्यात करण्यात आले. आता शेवटी केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत संसदेत भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत छत्रपती संभाजीराजे सर्वांना भेटून मराठा आरक्षणासाठी केंद्रावर दबाव आणावा, अशी मागणी करत आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपवरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले, पत्राचा ड्रफ्ट पहिला तर विशिष्ट प्रकार दिसतोय. त्याच्यात तथ्य किती आहे, हे पहिले पाहिजे. असे आरोप होऊ लागले आणि कुणीही आरोप करायला लागले, त्याची किती दखल घायची हा प्रश्न आहे. तसेच हे जाणीवपूर्वक षडयंत्र म्हणून कोणीतर असे उद्योग करत आहे, असे दिसत आहे. अशा तक्रारी आल्या तर चौकशी होणारच, आमच्या सरकारचे पक्षपाती चौकशी करणे हे ध्येय असून पोलीस याबाबत चौकशी करतील, असेही मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

थोड्या दिवसांनी आकडेवारी कमी येईल

सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना पाटील म्हणाले,थोडया दिवसांनी आकडेवारी कमी येईल. हळुहळू परिस्थिती निवळेल, अशी आजची स्थिती आहे.जिल्ह्याने आणखी काही दिवस संयम बाळगल्यास येत्या सात-आठ दिवसात रुग्ण संख्या कमी येईल, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.त्यामुळे सांगलीकर जनतेला दिलासा देणारे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा -आर्थिक संकटात 'नमराह कोविड हॉस्पिटल' गरिबांसाठी बनलंय संजीवनी

ABOUT THE AUTHOR

...view details