सांगली- जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची हत्या या दुर्दैवी घटना आहेत. सांगली पोलीस लवकर तपास करत आरोपींवर कारवाई करतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज (शुक्रवार) सांगलीमध्ये बोलत होते.
'राष्ट्रवादी नेत्यांची हत्या दुर्दैवी, पोलीस लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करतील' - राष्ट्रवादी सांगली
पलूस तालुक्यातील खटाव येथील आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. तर, ६ फेब्रुवारीला थोडे मंगळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचीही हत्या झाली आहे.
हेही वाचा -खून का बदला खून? राष्ट्रवादी नेत्याच्या हत्ये प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह तिघांना अटक
सांगली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची हत्या झाली आहे. पलूस तालुक्यातल्या खटाव येथील आनंदराव पाटील यांची हत्या करण्यात आली होती. तर, सहा फेब्रुवारीला कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचीही हत्या झाली आहे. दरम्यान, या दोन्ही खुनाच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून याप्रकरणी सांगली पोलीस योग्य तपास करून आरोपींना शिक्षा देतील, असा विश्वास यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.