सांगली - इस्लामपूर शहरातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील मुंबई सोडून सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी विटा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेतला.
इस्लामपूरमध्ये कोरोनाचा कहर.. मंत्री जयंत पाटील सांगलीत दाखल, प्रशासनाकडून सर्व तालुक्यांचा आढावा
इस्लामपूर शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. हा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे. इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने मंत्री जयंत पाटील मुंबईतून सांगलीत दाखल झाले असून त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेतला..
जयंत पाटील
विटा याठिकाणी मंत्री जयंत पाटील यांनी पोहचत खानापूर, आटपाडी, कडेगाव तालुक्यातील सर्व परिस्थितीची अधिकारी, लोकप्रतिनिधीकडून माहिती घेतली. तसेच इस्लामपूरमध्ये जसे,मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले तसे इतर तालुक्यात रुग्ण आढळून येऊ नयेत, यासाठी सर्व पातळ्यांवर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. तर इस्लामपूरमधील परिस्थितीचाही यावेळी मंत्री पाटील यांनी विशेष आढावा घेतला.