महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली महा'पूर'; मंत्री महाजनांना संतप्त पूरग्रस्तांनी घातला घेराव - KOLHAPUR FLOOD

सांगलीतील संतप्त पूरग्रस्तांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना घातला घेराव. शेवटच्या नागरिकाला येथून काढल्याशिवाय जाणार नाही, महाजनांनी दिले आश्वासन.

मंत्री महाजन

By

Published : Aug 10, 2019, 8:36 AM IST

सांगली- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सांगलीतल्या पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. सांगलीवाडी येथे मंत्री महाजन यांना पूरग्रस्तांनी घेराव घालत, प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. यावेळी मंत्री महाजन यांनी संपूर्ण नागरिकांना बाहेर काढल्याशिवाय आपण जाणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला. गिरीश महाजन कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अडचणीत सापडतात. शुक्रवारीही त्यांचा पूरग्रस्तांच्या मदतीवेळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सांगलीतील संतप्त पूरग्रस्तांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना घातला घेराव

सांगलीमध्ये महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो नागरिक अजूनही पुरात अडकलेले आहेत. अन्न, पाणी आणि प्रशासनाची न मिळणारी मदत यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सांगलीमध्ये या महापुराची स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना या पूरग्रस्त नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

सांगलीवाडीमध्ये पोहोचलेल्या मंत्री महाजन यांना संतप्त पूरग्रस्तांनी घेराव घालत प्रशासनाच्या निष्क्रीय कारभाराचा पाढा वाचत मंत्री महाजन यांना जाब विचारला, तसेच संपूर्ण नागरिकांच्या स्थलांतर झाल्याशिवाय सोडण्यात येणार नसल्याची भूमिका तेथील पूरग्रस्तांनी घेतली. त्यामुळे मंत्री महाजन यांची चांगलीच पंचायत याठिकाणी झाली. नागरिक थेट महाजन यांना भिडले होते. त्यामुळे महाजन यांनी आपण शेवटचा नागरिक स्थलांतर करेपर्यंत येथेच थांबू, असे आश्वासन दिले आणि मगच नागरिकांचा रोष थोडाफार कमी झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details