सांगली - पुरोगामी महाराष्ट्रात भाजप जाती-जातीत भेदभाव करण्याचा काम करत आहे, असा आरोप सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
तसेच देशातल्या महागाई प्रश्नावरून दुर्लक्ष करण्यासाठी भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत,असा आरोपही मंत्री पाटील यांनी करत राज्यातील एनपीएला कोणत्यास्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
भाजप राज्यात जाती-जातीत भेदभाव करण्याचे काम करतंय सहकारतील मान्यवरांना विविध पुरस्कार -सांगलीतील दि.सांगली ट्रेडर्स क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या दरवर्षी देण्यात येणारा जीवनगौरव व विविध पुरस्कार सोहळा शनिवारी सांगलीमध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. व्यापार-उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भाजपकडून जाती-जातीत भेद - या वेळी बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपावर टीका केली. केंद्रात ज्या वेळी भाजप विरोधात होते, त्यावेळी सिलेंडरचे दर वाढले की महागाईच्या नावाने ओरड करत होते. मात्र, आता प्रचंड महागाई वाढली असताना आता भाजप गप्प आहे. या वाढलेल्या महागाईपासून सामान्य जनतेच्या लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मग तो कर्नाटक राज्यातील हिजाबचा प्रश्न,असो किंवा राज ठाकरे यांचा अजानचा मुद्दा असो,पण आज पुरोगामी महाराष्ट्रात जाती-जातीत भेद करण्याचे काम भाजपाकडुन सुरू असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला आहे.
आता,एनपीएला मुदतवाढ नाही -या पुरस्कार सोहळ्यात दरम्यान आणि सहकारातील अनेक मान्यवरांकडून एनपीए मुदत वाढीच्या बाबत केलेल्या मागणीवरून बोलताना म्हणाले,एनपीए मुदत वाढीबाबत आपल्या विभागाकडे परवानगी मागतील होती,मात्र ती नाकारण्यात आली आहे. शेवटी वाढवून वाढवून आत किती वाढवायची मुदत. कारण जोपर्यंत तुम्ही कर्जदाराला,आम्हाला मुदतवाढ मिळत नाही,हे सांगत नाही,तो पर्यंत तो कर्ज भरणार नाही. तो तुमच्या आधी म्हणेल, तुम्हाला मुदतवाढ मिळाली आहे. कशाला गडबड करताय. त्यामुळे आम्ही असे निर्णय घेतले,पण ठीक आहे. त्रास होणार आहे.पण आपणाला निश्चित खात्री आहे. याचे परिणाम चांगले होणार आहेत,असे मत यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.
हार्वेस्टिंग मशीन पाठणार - राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नी बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, यंदाच्या वर्षी ऊसाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. गत वर्षी झालेला अतिपाऊस, मुबलक पाणी आणि उसाला मिळत असलेली चांगली एफआरपी याचा परिणाम उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे विदर्भ,मराठवाडा व अन्य ठिकाणी अतिरिक्त उसाच्या प्रश्नाबाबत आपण सातत्याने साखर आयुक्तांशी संपर्कात आहोत.पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला आहे. त्यामुळे याठिकाणी असणारे हार्वेस्टिंग मशीन हे औरंगाबाद,जळगाव,जालना आणि इतर ठिकाणी निर्माण झालेला अतिरिक्त ऊस क्षेत्रात पाठवले जातील,अशी माहितीही यावेळी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.