सांगली- शहरामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीला पूर आला आहे. कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी वाढले आहे. त्यामुळे सुमारे 100 हून अधिक घरे पाण्याखाली गेली असून शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कृष्णा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; सांगलीतील नदीकाठच्या शेकडो कुटुंबांचे स्थलांतर
कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी वाढले आहे. त्यामुळे सुमारे 100 हून अधिक घरे पाण्याखाली गेली असून शेकडो कुटुंबांचे स्थंलातर करण्यात आले आहे.
कृष्णा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
शहरातील सखल भागात दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट तसेच मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी हे नदीचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे येथील 300 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच नदीच्या पाणी पातळी वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.