महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हैसाळ कालवा ओव्हरफ्लो; शेतीचे नुकसान - शेतीचे नुकसान

सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात पाण्याची टंचाई भासत आहे, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची ओरड आहे. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेल्याच प्रकार घडला आहे. कालवा ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी आरग-बेडग रस्त्यावरील ओढ्यात पडल्याने ओढ्याला पूर आल्याप्रमाणे स्थिती पहायला मिळाली.

कालवा फुटी
कालवा फुटी

By

Published : Apr 4, 2021, 11:08 PM IST

सांगली - म्हैसाळ योजनेचा कालवा ओव्हरफ्लो होऊन मिरज तालुक्यातील बेडग याठिकाणी आरग रस्त्यावरील पूलावर पुरास्थिती निर्माण झाली होती. तर पाण्यामुळे 3 एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे बोलल्या जात आहे.

ओढ्याला पूर
सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात पाण्याची टंचाई भासत आहे, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची ओरड आहे. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेल्याच प्रकार घडला आहे. कालवा ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी आरग-बेडग रस्त्यावरील ओढ्यात पडल्याने ओढ्याला पूर आल्याप्रमाणे स्थिती पहायला मिळाली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


3 एकर शेती पाण्याखाली
तर या पाण्यामुळे बेडग येथील सुरेश पाटील या शेतकऱ्याचे तीन एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पाटील यांनी आपल्या शेतामध्ये नुकतीच ऊसाची लागवड केली होती. अचानक आलेल्या या पाण्याने ऊसाची केलेली लागवण माती सकट वाहून गेली आहे. त्यामुळे पाटील यांचं मोठे नुकसान झाला आहे.

हेही वाचा-कोरोनाविरुद्ध एकजुटीने लढू या.. उद्योजकांनी कामगारांची घ्यावी जबाबदारी - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details