सांगली - एसटी कर्मचाऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या आसूड हातात घेऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच एसटीचे विलीनीकरण झाले पाहिजे, अशी मागणी करत यासाठी लढा उभारण्याचा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यापुढे युनियन मुक्त कर्मचारी असा नाराही पडळकर यांनी दिला आहे. आटपाडीच्या झरे या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे आता सरसावले आहेत. आटपाडीच्या झरे या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून सुरू असणारी लूट आणि एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आणि विविध मागण्यांच्या बाबतीत चर्चा झाली.
'एसटी महामंडळाचे विलीनीकरण करा'
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यातल्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारला साडेतीन हजार कोटींचा कर गोळा होतो. मात्र तुलनेने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अत्यंत कमी आहेत, ते देखील त्यांना वेळेत मिळत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न असो किंवा अन्य सुविधांचा प्रश्न असेल, तो राज्य सरकारकडून मार्गी लावण्यात आला नाही. केवळ महामंडळ असल्याने एसटी कर्मचाऱ्यावर हा अन्याय होत असून तो आता यापुढे खपवून घेतला जाणार नाही. जे राज्य सरकार कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना ही आपली भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, ही आपली प्रमुख मागणी आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा. सरकार हा निर्णय घेणार नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांनीही आपल्या न्याय हक्कासाठी आता शेतकऱ्यांचा आसूड घेऊन रस्त्यावर उतरला पाहिजे, असे आवाहन पडळकर यांनी केले.
'सचिन वाझे म्हणजे माधव काळे'
परिवहन मंत्र्यांचा एसटी महामंडळातील सचिन वाझे म्हणजे माधव काळे आहे. निवृत्त झालेल्या माधव काळे उपव्यवस्थापक कसे बनवण्यात आले ? माधव काळे हा राज्य सरकरचा जावई आहे का? अनिल परब यांचा म्हेवणा आहे काय ? अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
'आता युनियन मुक्त एसटी कर्मचारी'