सांगली -जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.
सभापती तमनगौडा रवी पाटील यांची प्रतिक्रिया सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागात रिक्त आणि नव्या पदांची भरती करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून शिक्षण सेवेत रिक्त असलेल्या 510 पैकी 481 जागा पवित्र पोर्टलच्या माध्यामातून भरण्यात आल्या आहेत, यामध्ये जत तालुक्यात 209 जागा रिक्त होत्या, यापैकी 205 जागा भरण्यात आल्या आहेत, यामुळे याठिकाणी शिक्षकांचा निर्माण झालेला प्रश्न सुटला आसल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवीपाटील यांनी दिली.
हेही वाचा -बाप्पांसमोर अप्पर पोलीस अधीक्षकांचा फुगडीचा फेरा; तर उपअधीक्षकांचा पंजाबी तडका
या सोबतच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जिल्ह्यातील मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आरोग्य वर्धनी योजनेतून 370 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नव्याने भरती करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या दोन्ही विभागातील या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी मोठी मदत होणार आहे, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - पुणे विमानतळावरून उदयनराजे मुख्यमंत्र्यांसह दिल्लीला रवाना