सांगली - संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियोजन वडनेर समिती अहवालाबाबत सांगलीमध्ये आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक पार पडत आहेत. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नियोजनाबाबत चर्चा होणार आहे.
सांगलीत पश्चिम महाराष्ट्रीय पूर आपत्ती नियोजन व वडनेरे समितीची बैठक सुरू - sangli latest news
गेल्या वर्षीच्या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा पार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने महापुराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक मानली जात आहे.
गेल्या वर्षीच्या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा पार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने महापुराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक मानली जात आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर वडनेरे समितीचे सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत.
गेल्या वर्षी वारणा, कृष्णा नदीला महापूर आला होता. यामध्ये जवळपास १५ दिवस सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पाण्याखाली गेले होते. यामध्ये जनावरे वाहून गेली होती. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. यामध्ये गावच्या गावं उद्ध्वस्त झाली होती. शेवटी अल्लमट्टी धरणातून पाणी सोडल्यानंतर कृष्णा, वारणेचा महापूर ओसरला होता. १५ दिवसानंतर दोन्ही जिल्ह्यांनी मोकळा श्वास घेतला होता. या महापुरानंतर सरकारने वडनेरे समिती स्थापन केली. या समितीद्वारे महापुराच्या कारणांचा शोध घेतला गेला. आता त्यावर चर्चा सुरू आहे.