सांगली -शहरामध्ये रस्त्यावर वैद्यकीय जैविक कचरा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर सांगली महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत, या जैविक कचऱ्याचा उठाव केला आहे. या प्रकरणी परिसरातील रुग्णालयाला नोटीस बजावून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला आहे.
सांगलीतील रस्त्यावर वैद्यकीय कचरा; संबंधित रुग्णालयावर होणार दंडात्मक कारवाई - News about hospitals in Sangli city
शहारामध्ये रस्त्यावर वैद्यकीय जैविक कचरा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सांगली महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जैविक कचऱ्याचा उठाव केला आहे. या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयाशेजारी असणाऱ्या त्रिकोणी बागेजवळच्या रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारानंतरचे सिरीज,औषधांच्या बाटल्या असा जैविक कचरा टाकण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असणारा हा कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. त्यानंतर या कचऱ्याचा उठाव करण्यात आला आहे. या परिसरातील असणाऱ्या रुग्णालयामधून हा कचरा टाकण्यात आला असल्याने याबाबत रुग्णालयाला नोटीस पाठवून संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.