सांगली- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीस नकार देऊन आता शेतकऱ्यांच्या दारात मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही, अशी घणाघाती टीका जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी भाजपवर केली आहे. तसेच निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, असे मतही पाटकर यांनी व्यक्त केले आहे. त्या सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचारसभेत बोलत होत्या.
..आता शेतकऱ्यांच्या दारात मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही - मेधा पाटकर - loksabha
पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारत-पाक युद्धाच्या घटना सुरू होत्या. त्यावेळी छत्तीसगड मधील १ लाख ७८ हजार हेक्टर जमीन केंद्रातील भाजपा सरकारने स्थानिक सरकार किंवा त्या गावातील जनतेला न विचारता विकून टाकली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना जेष्ठ समाजसेविका व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या देशातील जनतेचे पैसे लुटून मूठभर उद्योजकांना सूट देण्याचा उद्योग सुरू असून देशातील मोठमोठ्या कंपन्यांना या भाजपा सरकारने जगवण्याचे काम सुरू केले आहे. कारण पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारत-पाक युद्धाच्या घटना सुरू होत्या. त्यावेळी छत्तीसगड मधील १ लाख ७८ हजार हेक्टर जमीन केंद्रातील भाजपा सरकारने स्थानिक सरकार किंवा त्या गावातील जनतेला न विचारता विकून टाकली आहे. निवडणुकीनंतर ती त्या उद्योजकांच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे तेथील लोक एकतर रस्त्यावर येतील, नाहीतर नक्षलवादी तरी बनतील असे मत यावेळी पाटकर यांनी व्यक्त केले.
आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज असतान या सरकारने संपूर्ण कर्जमाफी देण्यास नकार दिला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत स्पष्ट सांगून टाकले आहे. आणि आज याच शेतकऱयांच्या समोर मत मागायला येत आहेत. तेव्हा त्यांना लाज कशी वाटत नाही, अशी टीका करत देशाच्या राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, प्रत्येक मतदार संघात एक पुरुष आणि एक महिला असे आरक्षण राहिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.