महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली: मामाच्या घरी विवाहित भाचीची आत्महत्या - विवाहित आत्महत्या न्यूज

मंगळवारी तिचे मामाच्या घरी ऊस तोडणीसाठी मजूर आल्याने ते सगळे शेतात गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास पूजा ही घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मामा बापू मुकुंद गडदे यांनी तक्रार दिली आहे.

जत पोलीस ठाणे
जत पोलीस ठाणे

By

Published : Dec 1, 2020, 10:12 PM IST

सांगली-जत तालुक्यातील बाज येथे मामाच्या घरी आलेल्या नवविवाहित भाचीने मंगळवारी दुपारी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा धनाजी काळे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी मूळचे कवठेमंकाळ तालुक्यातील मानेवाडी येथील असणारी विवाहिता पुजा काळे ही चार दिवसापूर्वी तिचे मामा बापू गडदे यांच्याकडे आली होती. तिचे चारच महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. पती धनाजी काळे हे नोकरीनिमित्त परराज्यात असल्याने ती मामाकडे आली होती.

मंगळवारी तिचे मामाच्या घरी ऊस तोडणीसाठी मजूर आल्याने ते सगळे शेतात गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास पूजा ही घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मामा बापू मुकुंद गडदे यांनी तक्रार दिली आहे. तिने अचानक हा निर्णय का घेतला याचे कारण मात्र समजू शकले नाही. जत पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details