महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली कृषीउत्पन्न बाजार समितीच्या चौकशीचे आदेश, जमिन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप - जमिन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप

संगली कृषी उत्पन्न बाजार समितीत (Market cammitti) झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती (inquiry into Sangli APMC). पणन महामंडळाकडून त्यावर चौकशीचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. जमीन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप आहे (Sangli APMC allegation of land purchase scam). त्यामुळे बाजार समिती संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

बाजार समितीच्या चौकशीचे पणनकडून आदेश
बाजार समितीच्या चौकशीचे पणनकडून आदेश

By

Published : Sep 24, 2022, 4:42 PM IST

सांगली - पणन महामंडळाकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market cammitti) चौकशीचा अहवाल देण्याच्या आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत (inquiry into Sangli APMC). स्वतंत्र भारत पक्षाकडून संगली कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन पणन सहसंचालकाकडून बाजार समितीचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बाजार समिती संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

जमीन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिरज तालुक्यातल्या सावळी या ठिकाणी बेदाणा सौदे उभारण्यात येणारे आहे. यासाठी बाजार समितीकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे. मात्र या जमीन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे (Sangli APMC allegation of land purchase scam). त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची व बाजार समितीतील नोकर भरतीमध्ये मोठे प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला होता.

आर्थिक घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश -या प्रकरणी बाजार समितीच्या चौकशीची मागणी पणन महामंडळाकडे सुनील फराटे यांनी केली होती,अखेर या मागणीची दखल घेऊन पणन सहसंचालकांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधकांना चौकशी करून अहवाल देण्याबाबतचे आदेश बजावण्यात आल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे. तर पणन सहसंचालकाकडून आर्थिक घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश बजावण्यात आल्याने बाजार समितीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details