महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत चक्क जिवंत महिलेची तिरडी ओढून पालिकेविरोधात दलित महासंघाचे आंदोलन - सांगली महानगरपालिका लेटेस्ट न्यूज

स्मशानभूमीतील गैर कारभारा विरोधात दलित महासंघाच्या वतीने तीरडी मोर्चा काढण्यात आला. या प्रतिकात्मक तिरडीला ओढत पालिके समोर आंदोलन करण्यात आले.

सांगलीत तिरडी ओढून पालिके विरोधात दलित महासंघाचे आंदोलन

By

Published : Nov 18, 2019, 10:53 PM IST

सांगली -स्मशानभूमीतील गैर कारभाराविरोधात दलित महासंघाच्या वतीन पालिकेवर जिवंत तिरडी मोर्चा काढण्यात आला. प्रतिकात्मक तिरडीला ओढत पालिकेच्या कारभाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

सांगलीत तिरडी ओढून पालिके विरोधात दलित महासंघाचे आंदोलन


सांगली शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीत महापालिका प्रशासनाकडून सुविधा पुरवण्या ऐवजी मृतदेहाची हेळसांड होत आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाकडून गैरकारभार सुरू असल्याचा आरोप दलित महासंघाच्यावतीने करण्यात आला. स्मशानभूमीत सुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे. त्याचबरोबर त्या परिसरात अनेक अवैध उद्योग सुरू असल्याचा आरोप दलित महासंघाच्या वतीने करत आज सांगली महापालिका विरोधात आंदोलन करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून पालिकेवर जिवंत व्यक्तीचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. एका महिलेला या तिरडीवर झोपवून ही प्रतिकात्मक तिरडी ओढत नेऊन पालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाने स्मशानभूमीतील सुविधांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यास, या पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details