सांगली -मराठा समाजातील विध्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश रद्द बाबत राज्य सरकारकडून तातडीने निर्णय घेऊन प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या तरुण-तरुणींच्या प्रवेशाची व्यवस्था करून त्यांना न्याय मिळावा. अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समितीकडून आज देण्यात आला आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्याना आज याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
वैद्यकीय प्रवेश : ..अन्यथा मराठा समाज उसळून उठेल; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - Maratha youth
वैद्यकीय प्रवेश रद्द झालेल्या तरूण-तरुणींनी जिल्हाधिकारी यांच्या समोर आपली गाऱ्हाणी मांडत आपला प्रवेश रद्द होत असल्याची खंत व्यक्त केली. मराठा समाजाला कायदेशीर आणि घटनात्मक निकष घालून आरक्षण मिळले असताना देखील या आरक्षणाचा जर मराठा समाजातील तरुणांना फायदा होत नसेल तर मराठा समाजात उद्रेक झाल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.
मराठा समाजाला SCBC मधून आरक्षण मिळाल्याने समाजातील अनेक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश अर्ज केले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यंदाच्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय पदव्यूतर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे निवड झालेल्या मराठा समाजातील २५० विध्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सांगलीतील मराठा क्रांती मोर्चा समितीकडून आज सांगली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी वैद्यकीय प्रवेश रद्द झालेल्या तरूण-तरुणींनी जिल्हाधिकारी यांच्या समोर आपली गाऱ्हाणी मांडत आपला प्रवेश रद्द होत असल्याची खंत व्यक्त केली. मराठा समाजाला कायदेशीर आणि घटनात्मक निकष घालून आरक्षण मिळले असताना देखील या आरक्षणाचा जर मराठा समाजातील तरुणांना फायदा होत नसेल तर मराठा समाजात उद्रेक झाल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला.