महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : मंत्री वडेट्टीवारांच्या पुतळ्याला जोडे मारून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन - विजय वडेट्टीवर न्यूज

काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सांगलीत आंदोलन करण्यात आले.

Maratha Kranti Morcha demands resignations of vijay wadettiwar in sangli
सांगली : मंत्री वडेट्टीवारांच्या पुतळ्याला जोडे मारून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

By

Published : Jan 28, 2021, 10:10 AM IST

सांगली - काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सांगलीत आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेस कार्यालयासमोर मंत्री वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे.

विलास देसाई बोलताना...
जोडे मारून वडेट्टीवारांचा निषेध
जालना या ठिकाणी ओबीसी मेळाव्यामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना, मराठा आरक्षणाच्या बाबतीत गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल हा बोगस असल्याचे विधान केले. या विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंत्री यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

शहरातल्या काँग्रेस कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, त्याच बरोबर मंत्री वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पोस्टर व पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व मराठा समाजाबद्दल आकस बाळगून वारंवार चुकीचे वक्तव्य करणाऱ्या मंत्री वडेट्टीवार यांची मंत्री मंडळातून आघाडी सरकारने हकालपट्टी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details