महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणसह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आमदारांच्या घरासमोर हलगी आंदोलन - सांगली मराठा क्रांती मोर्चा हलगी आंदोलन

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले आहे. आज पासून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आणि अशोक चव्हाण यांना मराठा समाजाकडून 1 लाख मेसेज पाठवण्यात येणार असल्याचे सांगली मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

maratha kranti andolan success in sangli
maratha kranti andolan success in sangli

By

Published : Sep 22, 2020, 3:47 PM IST

Updated : Sep 22, 2020, 4:16 PM IST

सांगली - मराठा आरक्षणसह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाच्याा वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या घरासमोर हलगी वाजवून आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीचा निषेध नोंदवत, आमदार-खासदारांनी मराठा आरक्षण बाबत विधानसभेमध्ये आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे.

मराठा आरक्षणसह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आमदारांच्या घरासमोर हलगी आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभर मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले आहे. सांगलीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर हलगी वाजवून आरक्षण स्थगितीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर आमदारांना आरक्षण मागणीचे निवेदन देत राज्यातील नोकर भरती बाबतीत सरकारने कोणताही निर्णय घेऊ नये, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची नोकरभरती राज्यांमध्ये सरकारने करू नये,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सांगलीत 25 सप्टेंबरला तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून आज पासून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आणि अशोक चव्हाण यांना मराठा समाजाकडून 1 लाख मेसेज पाठवण्यात येणार असल्याचे सांगली मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्पष्ट करत लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. तर यापुढील काळात मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा क्रांती
मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

Last Updated : Sep 22, 2020, 4:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details