महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जाणून घ्या; इस्लामपुरात कोणत्या दिवशी कोणती दुकाने राहणार सुरु

ल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इस्लामपूर शहरात झालेला कोरोनाचा प्रसार विचारात घेता यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी उपविभागीय अधिकारी वाळवा यांनी शहरातील व्यापारी संघटनेच्या प्रमुखांची बैठक घेतली.

व्यापारी संघटनेच्या प्रमुखांची बैठक
व्यापारी संघटनेच्या प्रमुखांची बैठक

By

Published : May 5, 2020, 10:36 AM IST

सांगली- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इस्लामपूर शहरात झालेला कोरोनाचा प्रसार विचारात घेता यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी उपविभागीय अधिकारी वाळवा यांनी शहरातील व्यापारी संघटनेच्या प्रमुखांची बैठक घेतली.

बैठकीत खालीलप्रमाणे वस्तू विक्रीसाठी आठवड्यातील तीन दिवस निश्चित केले -

किराणा दुकाने, किराणा सुपर मार्केट, घाऊक धान्य दुकाने, सर्व होलसेल व रिटेल विक्रेते, आइस्क्रीम पार्लर, बेकरी मिठाईची दुकाने, फुले यांची रस्त्यावर बसून विक्री न करता दुकानांमध्ये बसून विक्री करणे. या सर्वांच्या विक्रीसाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ निश्चित केलेली आहे.

फोटो स्टुडिओ, डिजिटल प्रिंटिंग, हार्डवेअर, बांधकाम साहित्य, फर्निचर टाईल्स, सॅनिटरी वेअर, सिमेंट, सळी, ॲल्युमिनियम, पॅनल, बार, पाण्याची टाकी, सिंटेक्स टाकी विक्री, बांबू व तत्सम व्यवसाय यांनी शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडायची आहेत.

कापड दुकान, टेलर, स्पोर्ट्स, वेदर स्पोर्ट्स साहित्य खरेदी विक्री, किचन अप्लायन्सेस, होम अप्लायन्सेस, भांडी विक्री दुकाने, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती विक्री, टू व्हीलर फोर व्हीलर दुरुस्ती विक्री, सायकल दुरुस्ती व विक्री, मोबाईल विक्री व दुरुस्ती, ज्वेलरी, चप्पल, बॅग, सौंदर्य प्रसाधने, बुक स्टोअर्स, चष्मे विक्री व दुरुस्ती, घड्याळ विक्री दुरुस्‍ती, गिफ्ट गॅलरी, औषधे, फ्रेम मेकर, स्टेशनरी इत्यादी दुकानदारांना मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची वेळ दिली आहे.

दूध विक्री, पिठाची गिरण, कांडप यंत्र, सिलेंडर विक्री दुकाने, टेस्टिंग लॅब, कृषी साहित्य विक्री व दुरुस्ती, पशुखाद्य विक्री, बँक ग्राहक सेवा सुविधा केंद्र, मिनरल वॉटर हीटर इत्यादी वस्तूंची दुकाने रोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये सुरू राहतील. तसेच दवाखाना व मेडिकल हे अत्यंत आवश्यक सेवा असल्याने त्यांना वेळेचे कोणतेही बंधन नसल्याचेही बैठकीमध्ये सांगण्यात आले.

याचबरोबर दैनंदिन भाजी मंडई व आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील. सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेमध्ये प्रभागांमध्ये फिरून भाजीपाला व फळे विक्री करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरती बसून कच्चे दुकान टाकून कोणत्याही प्रकारची विक्री करता येणार नाही. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details