सांगली- कोकणातील आंबा सांगलीकरांना माफक दारात उपलब्ध झाला आहे. निमित्त आहे, आंबा महोत्सवाचे. कृषी व पणन विभागाच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीमध्ये पहिल्यांदाच, अशा पद्धतीच्या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सांगलीकरांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोकणाचा आंबा बागेतून थेट सांगलीकरांच्या हातात, पहिल्यांदाच आंबा महोत्सवाचे आयोजन - sarfaraj sanadi
सांगलीमध्ये पहिल्यांदाच आंबा महोत्सव
फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे. आंबा म्हणजे कोकण, अशी ओळख असली तरी, कोकणातील आंब्यांची चव खूप कमी प्रमाणात नागरिकांना चाखायला मिळते. अस्सल हापूस आंब्याचे दरही अधिक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ते परवडत नाहीत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या बागेतील हापूस आंबा थेट नागरिकांना मिळावा, या उद्देशाने कृषी, पणन विभागामार्फत मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील भवन येथे सांगलीकरांसाठी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवारी (आज ) या महोत्सवाचे सांगलीमध्ये उद्घाटन झाले. कोकणाच्या बागेत नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा थेट सांगलीकरांना उपलब्ध झाला आहे. या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १५ पेक्षा अधिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये केशरी, देवगड हापूस आंबा याठिकाणी माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातुन थेट ग्राहकांपर्यंत आंबा हा पाहिल्यांदाचा राबविण्यात आलेल्या उपक्रमाला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. २० मे पर्यंत हे आंबा महोत्सव चालणार आहे.